चेन्नईमधील पल्लीरनई परिसरात एक धक्कादायक अपघात घडला आहे. 23 वर्षीय तरुणीच्या अंगावर बेकायदेशीर लावलं होर्डिंग पडलं. त्यानंतर एका पाण्याच्या टॅंकरने तिला टक्कर दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. या तरुणीचं शुभाश्री असं असून ती सॉफ्टवेयर इंजीनियर आहे. हे होर्डिंग ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षामार्फत (अण्णाद्रमुक) लावण्यात आलेलं होतं.

2017 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या सिग्नलवर बॅनर, होर्डिंग्स आणि जाहिराती लावण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या नियमाकडे दुर्लक्ष केलं आहे. मागच्या वर्षी पुण्यामध्ये होर्डिंग पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *