उत्तर प्रदेशातील जालोनमध्ये गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. गांधी इंटर कॅालेजमध्ये हा प्रकार घडला आहे. उत्तरप्रदेशामधील अनेक राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. गांधी इंटर कॅालेजचे प्राचार्य रवी कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

प्रियांका गांधी यांनी देखील या प्रकरणात आपला राग व्यक्त केला आहे. प्रियांका म्हणतात की, रात्रीच्या अंधारात लपून देशातील महापुरुषांचा तुम्ही अपमान करत अहात. परंतू तुम्ही या महानपुरुषांच्या महानतेला धक्का पोहचवू शकत नाही. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे डॅा. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पूतळ्याची विटंबना करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *