संघ आणि फडणवीस सरकारने घेतलेला महाराष्ट्रातील गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय हा अतिशय वाईट आणि निषेधार्थ आहेच. यावर महाराष्ट्र काय देशभरातून मराठी माणूस विरोध करतोच आहे. परंतु  या पेशवाई निर्णयाविरोधात काही शिवभक्तांनी सोशल मीडियावर घेतलेला निषेधाचा मार्ग हा अतिशय लाजिरवाणा, चुकीचा आणि शिवद्रोही आहे. हो मी इथे अशांना शिवभक्तच म्हणेन कारण भक्तांना अक्कल नसते. ते बुद्धीचा आणि तर्क शक्तीचा वापर करीत नाहीत. फक्त अविचारी स्वभावाने व्यक्त होत असतात.

स्त्रीचा सन्मान आणि आदर हे आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय आणि शंभूराजे यांच्या चरित्रातून जीवनातून शिकलोच, नाही का? ज्या पद्धतीने अमृता फडणवीस यांच्यावर घाणेरड्या टिपण्या होत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे. यासाठीच मित्रानो शिवरायांच्या जीवनातील रांझे पाटील आणि कल्याणच्या सुभेदाराची सून ही प्रकरणं आठवा. अरे आज जर शिवराय किंवा शंभूराजे असते तर त्यांनी अगोदर तुमचेच हात पाय कापून चौरंग केला असता. हत्तीच्या पायाखाली दिले असते. स्त्रीचा अपमान करणे किंवा स्त्रीवर लाजिरवाण्या घाणेरड्या टिपण्या करणे हा आपल्या द्रविड संस्कृतीचा वारसा नाही. अगदी मग ती कोणतीही स्त्री असो, अगदी  मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील असो नाहीतर सामान्य शेतकरी  कष्टकरी कुटुंबातील असो. स्त्री चा सन्मान आणि आदर ही आपली परंपरा आहे.

याशिवाय मुख्यमंत्री राहत असलेल्या वर्षा बंगल्यावरील टिपण्या ही थांबवा. कारण वर्षा बंगला ही फडणवीस यांची वैयक्तिक मालमत्ता नाही ती महाराष्ट्र राज्याची संपत्ती आहे. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी निवासस्थान आहे आणि त्यात फडणवीस राहतात कारण ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अगोदर हे थांबवा, जर या सरकारचा यातील माजोरड्या नेत्यांचा अपमान करायचा असेल तर अगोदर त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवायाची तयारी करा. त्यासाठी इथे आम्ही भाजप आणि शिवसेनेला मत देत  नाही, असे बोलून होणार नाही. हे आम्हा सर्वांनाच माहिती आहे.  समजून घ्या हे मोदी किंवा फडणवीस सरकार सत्तेत त्यांना मिळालेल्या मतदानामुळे सत्तेत नाहीय, तर फक्त आणि फक्त EVM च्या गैरवापरामुळे सत्तेत आहे.  नाहीतर संपूर्ण देश आणि महाराष्ट्र मधील जनता विरोधात असूनही आज फडणवीस जो फाजील आत्मविश्वास दाखवीत आहेत आणि असे घाणेरडे निर्णय घेत आहेत ते EVM च्या जोरावरवच आहे. त्यामुळेच तर जे कोणी EVM विरोधात बोलतील अशांनाच ते चाणक्य नीतीच्या साम, दाम, दंड आणि भेद याचा वापर करून संपवीत आहेत. उदा.  राज ठाकरे यांची चौकशी किंवा विकले जात असलेले नेते हे आहे.

मित्रांनो ते या मोठया नेत्यांच्या घरी ED पाठवून त्यांना शांत करू शकतात परंतु  ते आपल्या घरी ED पाठवू शकत नाहीत. ते आपली काय चौकशी काय करणार?  अठराविश्व गरीबी सोसलेली गरिबी पिढ्यानपिढ्या मेहनत आणि कष्ट करून जगलेलो, स्वराज्यासाठी हाती हत्यार घेऊन लढलेलो आहोत. आता पुन्हा स्वराज्यासाठी बाहेर यावं लागेल. आपण हा EVM चा मुद्दा लावून धरत मोदी आणि फडणवीसला सळो की पळो करून सोडू शकतो. या धर्मांध राक्षसाचा जीव EVM मध्ये आहे ते EVM च  आपल्याला ठेचावं लागेल. आता स्वराज्य प्राप्तीसाठी हेच करावं लागेल. हा धर्मांध राक्षस जास्तीस जास्त काय करेल? आपल्यातीलच बेअक्कल मोदी भक्तांना आपल्यावर सोडून धमक्या आणि हल्ले करवू करेल. पण स्वराज्यासाठी शिवरायांनी आपल्याच चंद्रराव मोरे आणि बाजी घोरपडे यांचा कोथळा काढला हे आपल्याला ठाऊक असेल ना? ते आपणही करू शकतो.

असो शेवटी विद्रोही संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणत त्याची आठवण करून देतो.

भले तरी देवू गांडीची लंगोटी |

नाठाळाचे काठी मारू माथा ||

@प्रमोद शिंदे 

हम सब स्वराज्यरक्षक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *