महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्मिला येवले यांनी ही शाई फेकल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

अकोलेमध्ये सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा निघाला. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्यात आली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार वैभव पिचड यांना भाजपने विधानसभेचं तिकीट देऊ नये. तसंच लोकोपयोगी असलेलं महा पोर्टल चालू करावं, या मागण्या करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्यात आली. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षतेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *