भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे. दरम्यान सेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्षात घेताना आज भाजपला राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिला आहे.

भाजपचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं होतं.  आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

आदरणीय पवार साहेब आणि पक्ष जी काही जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे निभावेल, असं विजय घोटमारे म्हणाले. माजी मंत्री रमेश बंब, राजू राऊत तसंच प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *