देवेंद्र फडणवीस हे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका, असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा मागणार आहे. त्यामुळे या जागांवर तयारी सुरू करा, असा आदेश जानकारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

भाजप-सेना महायुतीच्या जागावाटपामध्ये रासप,शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी १८ जागा देण्याचं ठरलं आहे, असं जानकर म्हणाले. राज्यात रासपचं बळ वाढलं आहे. त्यामुळे या १८ जागांपैकी दहा ते बारा जागा लढवणार असल्याचं जानकारांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *