राज्य सरकारने दलित शब्द यापुढे शासकीय कामकाजात वापरु नये, असा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. भाजपने दलित शब्दाचं राजकारण करुन या वादात पडू नये. दलित हा शब्द आमच्या फायद्याचा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दलित हा शब्द व्यवहारात असायलाच हवा – रामदास आठवले

शासकीय नोंदीमध्ये जातीचा उल्लेख करताना दलित हा शब्द यापूर्वीही वापरला जात नव्हता. त्यामुळे शासकीय नोंदीमध्ये दलित शब्दाला मनाई ठीक आहे. मात्र व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांमध्ये दलित शब्दाला मनाई करता कामा नये. दलित शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच आम्ही भारतीय दलित पँथर या संघटनेची स्थापना केली होती. माझ्या मते दलित शब्द व्यवहारात असायलाच हवा असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *