नेत्यांच्या अपमानाला कंटाळून उत्तर प्रदेशमधील एका दलित अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. या अधिकाऱ्याचं नाव त्रिवेंद्र कुमार आहे. 23 वर्षीय त्रिवेंद्र यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्रिवेंद्र कुमार यांनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी म्हणून केली होती. मागच्या वर्षी त्यांना कुंभी गटामध्ये नियुक्त करण्यात आलं होतं.

त्यांच्या मृतदेहाजवळ वडिलांना उद्देशून लिहिलेली चिठी सापडली आहे. या चिठीत त्यांनी आपल्या आत्महत्येसाठी एका शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष, रसूलपूरचा सरपंच आणि अन्य एका सरपंचाचा मुलगा हे दोषी असल्याचं म्हटलं आहे. एका बैठकीत या अधिकाऱ्याचा अपमान करण्यात आला होता. त्रिवेंद्र हे कामचुकार आहेत अशा अधिकाऱ्यांना मारुन हाकलून दिलं पाहिजे अशा प्रकारे त्यांना हिणवण्यात आलं होतं. मी अपयशी ठरलो आहे असंही त्यांनी चिठीत लिहिलं आहे. उदास मनाने त्यांनी आपलं जीवन संपवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *