आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस मुंबईमध्ये २५ जागांवर लढणार आहे. यामधील १९ जागांवर उमेदवार देखील निश्चित करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये १९ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

छाननी समितीची बैठक पार पडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी ६ जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं थोरात यांनी सांगितलं. यासह समाजवादी पक्षाला एक जागा सोडण्यात आली आहे.

काँग्रेसच्या छाननी समितीची पुढील बैठक १४ सप्टेंबरला होणार आहे. उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी काँग्रेस उमेदवारांची नावं लवकर जाहीर करणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *