शिवसेनेच्या आयटी सेलचे कार्यकर्ते रमेश सोलंकी यांनी नेटफ्लिक्स विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हिंदू धर्माची बदनामी होत आहे. नेटफ्लिक्समुळे जगभरात हिंदू धर्माची प्रतिमा खराब होत आहे. नेटफ्लिक्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचं सोलंकी यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

रमेश यांनी पोलिसांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात सेक्रेड गेम्स, लैला, घौल या तीन वेब सीरीजची उदाहरणे दिली आहेत. या वेब सीरीजमध्ये हिंदू धर्माचं चूकीचं चित्रण केलेलं आहे. रमेश म्हणतात़ की, सेक्रेड गेम्स  मध्ये अहम ब्रम्हास्मी या मंत्राचा चूकीचा वापर केला आहे. आपल्या देशाची वाईट प्रतिमा निर्माण करणारा कंटेट नेटफ्लिक्स निर्माण करतो. त्यामुळे या वेब सीरीजच्या टीम आणि नेटफ्लिक्स विरोधात कारवाई करण्याची विनंती रमेश यांनी पोलिसांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *