राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सेना-भाजपमध्ये होत असलेल्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते. अचानक तिथे झम्प्या कुतुहलाने बघायला गेला. त्यावेळी उदयनराजे भोसले, भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असं ओरडत बाहेर आला, अशा आशयाचं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

उदयन भोसलेंवर देखील आव्हाडांची टीका

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उदयन भोसलेंनवर देखील टीका केली आहे. साहेब उदयनराजेंवर तुम्ही मानापासून प्रेम केलं. सातारातल्या आपल्या जवळच्याना दुखावले. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत. पोटच्या पोरावांनी प्रेम केलंत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरदपवारांचा बालेकिल्ला”, असं ट्विट आव्हाड यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *