खड्डा आणि मुंबईकर हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून चाललं आहे. रस्त्यांवरील खड्डयांनी मुंबईकर त्रस्त आहेत. मात्र, मुंबई महापालिका याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही आहे. यावर उपाय म्हणून मनसेने ‘सेल्फी विथ खड्डा’ अशी स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धत मुंबईकरांनी भाग घ्यावा आणि खड्ड्यांसोबत एक छान सेल्फी काढून पाठवण्याचे आवाहान केलं आहे. यासाठी त्यांनी पारितोषिक देखील ठेवलं असून प्रथम क्रमांकाला ३ हजार, द्वितीय क्रमांकाला २ हजार आणि तृतीय क्रमांकाला १ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

मनसेने वर्सोवा येथे चौकाचौकांवर या स्पर्धेबाबतची बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमध्ये नागरिकांना खड्ड्यांसोबत सेल्फी पाठवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, महापालिकेने मनसेचे हे बॅनर्स हटवले आहेत. वर्सोवा येथे मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी सेल्फी विथ खड्डा ही स्पर्धा आयोजित केली आहे. तसच ही स्पर्धा आचारसंहिता लागू होईपर्यंत सुरू असेल, असं देखील बॅनरमध्ये सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा नाही असा अजब दावा शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी केला होता. सत्ताधारी निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. सत्ताधारी दौऱ्यावर आणि जनता वाऱ्यावर असंच काहीसं म्हणावं लागेल. खड्ड्यांमुळे आतापर्यंत दहा पेक्षा जास्त मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *