राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर जाधव  यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भास्कर जाधव लवकरच शिवबंधन बांधणार असल्याची बातमी होती. अखेर भास्कर जाधव यांनी या बातमीला दुजोरा देत १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर  शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

जिल्हा परिषदचे ९ सदस्य माझ्यासोबत राहणार आहेत. तसंच गुहागर पंचायत समिती आणि ७३ सरपंच हे माझ्यासोबत आहेत असं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. यामुळे राष्ट्रवादीला कोकणात मोठं भगदाड पडणार आहे. शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी सोडली असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. यासह माझं म्हणणं मी लिखित स्वरूपात पवार साहेबांकडे दिलं आहे असं देखील भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *