केंद्र सरकार दहा बॅंकांचे विलिनिकरण करणार आहे. या निर्णया विरोधात सप्टेंबरच्या 26 आणि 27 तारखेला बॅंक कर्मचारी संपावर जाणार आहेत. सरकारने बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही बँक कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाऊ शकतात, असं बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी हा संप घोषित केला आहे.
1)ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन
2)ऑल इंडिया बँक आफिसर्स असोसिएशन
3)इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस
4)नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स

26 सप्टेंबरला गुरुवार आणि 27 सप्टेंबरला शुक्रवार आहे. त्यानंतर चौथा शनिवार असल्यामुळे बॅंकांचं काम हे चार दिवसांसाठी बंद राहणार आहे. या संपामुऴे सामान्य लोकांची बॅंकांची कामे चार दिवसांसाठी थांबणार आहेत. खाजगी बॅंकांचे काम सुरु राहणार आहे. या संपात केवळ सरकारी बॅंका सहभाग घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *