कोल्हापूर आणि सांगलीमधल्या पूरग्रस्तांसाठी संपूर्ण राज्यातून मदत येत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे आल्या आहे. उर्मिला आज काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मिरज, इचलकरंजी, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाल्या आहेत.

‘प्रार्थना करण्यासाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत.पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा यापासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित’अशा शब्दात उर्मिला यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यामातून व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींवर पूरग्रस्तांची मदत न केल्यामुळे टीका करण्यात आली होती. परंतू या टीकेनंतर अनेक कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *