सीबीआई ने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयामध्ये भाजप आमदार कुलदीप सेंगर आणि त्याचा भाऊ शशि सिंह याच्यावर पीडितेने केलेले आरोप खरे आहेत असं सांगितले आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपा आमदार कुलदीप सेंगर हे आरोपी आहेत. न्यायालयात सीबीआई ने सांगितलं की, ४ जून २०१७ रोजी पीडितेला फसवून आमदार कुलदीप सेंगर आणि शशि यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. जून २०१७ ला नोकरीसाठी तरुणी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या घरी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वीच उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पीडितेने मुख्य न्यायाधीशांना देखील पत्र लिहिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात अनेक महत्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील खरे आरोपी समोर आले आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पीडितेने या प्रकरणात मुख्यमंत्री योगी यांना पत्र लिहिलं होतं. परंतू १२ जानेवारी २०१८ पर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यानंतर पीडितेची आई ही उन्नाव न्यायालयात गेली. ३ एप्रिल २०१८ मध्ये पीडितेचे वडील दिल्ली येथून उन्नाव न्यायालयात सुनावणीसाठी गेले होते. यानंतर पोलिसांनी आपल्या चौकशीत सांगितले की, पीडितेने लावलेले आरोप खरे नाही आहेत. पीडितेच्या वडीलांना देखील जबर मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. सीबीआईने पीडितेला धमक्या येत होत्या हे देखील मान्य केलं. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.

1 Comment

  1. अतिशय दर्जेदार वृत्तांकन कलमनामा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *