कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत कोल्हापूरात जमावबंदीचा दिलेला आदेश मागे घेण्यात आला आहे.  जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना टाळण्यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूरात १२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.

धोका अजून टळलेला नाही

महापूरातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगलीसह पुण्यातील घाट क्षेत्रामध्ये १३ आणि १४ ऑगस्टला मुसळधार पडणार असल्याचं पुणे वेधशाळेने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *