महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महिला वाहन चालकांची भरती करणार आहे. राज्यातील महिलांसाठी हा निर्णय खुप महत्वाचा आहे. महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीमध्ये 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यानुसार 2406 पदांसाठी महिलांची भरती केली जाणार आहे. यासाठी सरकारने महिलांसाठी उंचीचा नियम देखील शिथिल केला आहे. 160 सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी ग्राह्य धरलं जाणार आहे. 289 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील 163 महिलांची निवड करण्यात आली.

या मधील बहुतांश महिला या आदिवासी भागातील आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक आदिवासी महिला या मुख्य प्रवाहात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळचा महिला चालक प्रशिक्षण कार्यक्रम काल बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 15 महिला एसटी चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *