दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची ‘सेक्रेड गेम्स २’ ही वेब सीरिज भारतात खूपच गाजत आहे.  या सीरिज मधील एका सीनमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी दिल्ली पोलिसांकडे अनुरागच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.

अभिनेता सैफ अली खान यांने ‘सेक्रेड गेम्स 2’ मध्ये सरताज सिंग नावाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 15 ऑगस्ट रोजी ‘सेक्रेड गेम्स 2’ प्रदर्शित झाला होता. एका सीनमध्ये सरताज सिंह हातातील कडा काढून समुद्रात टाकून देतो. शीख धर्मात पंच ‘क’ करार यास प्रचंड महत्व आहे. कंघी, केश, कडा, कच्छा आणि किरपान म्हणजे पंच ‘क’ करार होय. शीख धर्मात कडा महत्त्वाचा असून पवित्रही मानला जातो. यामुळे शीख धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळेच बग्गा यांनी अनुराग विरोधात तक्रार केलेली आहे. यावर अनुराग कडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *