गृहमंत्री अमित शहांनी जम्मू काश्मीरसाठी सोमवारी ऐतिहासिक कलम ३७० हटवण्याची मागणी केली.  यामागणीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असल्याचं सांगितलं. जम्मू काश्मीरसह लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येणार आहे. बसपाने देखील याला समर्थन दिलं आहे.

बसपाचं समर्थन तर जेडीयु, नॅशनल कॉन्फरन्सचा विरोध

गुलाब नबी आजाद यांनी भाजप लोकशाहीची हत्या करत आहे, असं म्हटलं. तर, राज्यसभेत लोकशाहीची हत्या नाही चालणार, अशा घोषणा दिल्या जात आहेत. बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी आमच्या पक्षाकडून पूर्ण समर्थन आहे, असं सांगितलं. आमचा पक्ष कोणत्याही प्रकारे विरोध दर्शवत नाही आहे. यासह लडाखच्या भाजप आमदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी देखील समर्थन दिलं आहे. मी लडाखच्या नागरिकांतर्फे या विधेयकाचं समर्थन करत असल्याचं म्हटलं. जेडीयुच्या केसी त्यागी म्हणाले, आमचे प्रमुख नितीश कुमार जेपी नारायण, राम मनोहर लोहिया आणि जॉर्ज फर्नांडिस यांची परंपरा पुढे घेऊन जात आहेत. यामुळे आमचा पक्ष या विधेयकाचं समर्थन करत नाही. यासह जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमर अब्दुल्ला यांनी विरोध करत याचे धोकादायक आणि गंभीर परिणाम होतील असं म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *