@शहाजी पाटोदेकर

दहा वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. मुलुंडला रहता होतो. त्या बिल्डिंग मध्ये गुजराती, जैन गुंतवणूक दारांनी बरेचसे फ्लॅट घेउन ठेवले होते. दुसऱ्यांना फ्लॅट विकायचा नाही असा अलिखित नियम होता. मी मात्र बिल्डरच्या मैत्रीचा फायदा घेउन माझ्यासाठी एक फ्लॅट मिळवला. रहायला सुरुवात केली तसा एक जण माझ्या कडे येउन सुचना देउन गेला. इथ आमची जास्त मेजॉरीटी आहे तेव्हा इथं संपूर्ण शाकाहाराचा अवलंब झाला पाहिजे. नवखा असल्याने ज्यास्त अरग्युमेंट केलं नाही. अन खुप महत्त्वही दिलं नाही.

एका रविवारी तो चक्क घरात पोहचला. मटण शिजत होतं. रागाने लालेलाल झाला. थयथयाट सुरू झाला. मग मात्र मी माझा इंगा दाखवला. पळुन गेला घरातुन. थोड्यावेळात चारपाच जणांना बरोबर घेऊन आला. मी सावध होतो. माझी तयारी पाहून त्यांचा दुसरा म्होरक्या पुढे आला. म्हणाला ‘भाईसाब अब जाने दो, अगले बार ये गलती मत करो’. पुढच्या रविवारी मी पारदर्शी प्लास्टिक पिशवीतुन मस्त मटण घेऊन आलो. सगळे खिडकीतून डोकावत होते. तोपर्यंत त्यांनी माझी माहिती काढली होती. अन पुन्हा नादाला लागायची हिम्मत जुळवता येत नव्हती. पाच वर्ष ठसन.
ते घर सोडून दुसऱ्या मोठ्या घरात शिफ्ट होताना आम्हाला घर विकुन जा हा त्यांचा आग्रह. मी मात्र एका शिख मित्राला घर विकल.
गल्लीतील ३७० मी तेव्हा रद्द केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *