जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांना सांगली येथील पूरग्रस्तांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला, असा सवाल संतापलेले लोक करत होते. स्थानिकांच्या रोषाने दोन्ही मंत्र्यांची अडचण झाली. कुठल्या ही प्रश्नला त्यांना उत्तर देता येत नव्हतं.

पूरग्रस्तांची पाहणी करताना गिरीश महाजन सेल्फी काढत होते. याबाबत आधीच त्यांच्या टीकेची झोड उठली आहे. संवेदना नसलेले मंत्री अशी टीक राज्यसरकारवर होत आहे.पुरात हजारो लोक अडकले असताना अद्याप  सरकारची मदत पोहचलेली नाही. या पूरामुळे हजारो नागरीक बेघर झाले आहे. लोक काही दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनावर आणि सरकारवर संतापलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *