केंद्र सरकारला अतिरिक्त निधी दिल्यानंतर आरबीआयचा आपत्कालीन निधी कमी झाला आहे. आरबीआय अचानक आलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आकस्मिक निधी ठेवतो. मात्र, सरकारला निधी दिल्यानंतर हा निधी कमी होऊन सहा वर्षांची निच्चांक पातळी गाठली आहे. आरबीआयचा वार्षिक २०१८-१९ च्या अहवालानूसार ३० जून २०१८ ला हा निधी २.३२ लाख कोटी इतका होता, तो आता १.९६ लाख कोटी रुपये एवढा राहिला आहे.

शुक्रवारी आरबीआय आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहिसाठी जीडीपीचे आकडे घोषित करणार आहे. हा विकासदर ५.७ टक्के तसंच यापेक्षा कमी असू शकतो, असं म्हटलं जात आहे. मागील आर्थिक वर्षात शेवटच्या टप्प्यात विकास दर ५.८ टक्के होता. दरम्यान, आरबीआयसह आंतरराष्ट्रीय एजन्सीनी देखील चालू आर्थिक वर्षात पूर्ण वर्षभर भारताचा विकास दर सात टक्के आणि त्याच्यापेक्षा कमी ठेवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *