इचलकरंजी शहरातील अनेक शाळांमध्ये व इतर हॉलमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्याची सोय केली आहे. आपण तिथपर्यंत पोहचून पूरग्रस्तांच्या कुटुंबियांना आपल्या परीने मदत करणे सध्या अतिशय महत्वाचे आहे. या साठी आज सकाळपासून राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे सैनिक मदत करत आहेत. आतापर्यंत नाकोडा हायस्कुल येथे स्थलांतरित कऱण्यात आलेल्या पूरग्रस्तांना कपडे वाटलेले आहेत.


एन.डी.मगदूम प्रशालेमध्ये कपडे वाटण्यात आले. जनावरांना छताचे नियोजन करण्यात आले.
पण तिथे अजूनही लहान मुलांचे कपडे, साड्या, ब्लॅंकेट, अंथरून, बेडशीट अश्या कपड्यांची नितांत गरज आहे. सेवा दल सैनिक पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहेत. त्यासाठी तुमचेही सहकार्य अपेक्षित आहे.
आपण तुम्हाला जी शक्य आहे ती मदत आमच्यापर्यंत पोहचवू शकता, आम्ही ती मदत तात्काळ पूरग्रस्तांपर्यंत पोहचवू.

1. लहान मुलांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांच्यासाठी कपड्यांची सर्वात जास्त गरज आहे.
2. स्त्रियांसाठी साड्या, ब्लाउज, गाऊन, चुडीदार, टॉप, लेगिन्स, ओढण्या यांची गरज आहे.
3. जीन्स, टी-शर्टस, स्वेटर, जॅकेट, शर्ट हेही त्यांच्यापर्यंत पोहचवणे महत्वाचे आहे.
4. ब्लॅंकेट, चटया, पांघरून, अंथरून, बेडशीट, शाल, स्वेटर अश्या थंडीपासून संरक्षण करतील अश्या कपड्यांची सुद्धा खूप गरज आहे.
5. शिवाय वृद्ध पूरुष व महिला यांनाही कपड्यांची गरज आहे.
तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्या जवळपास 200 जणांच्या टीम साठी चहा व नाश्त्याची सोय सुद्धा सेवा दल सैनिक करत आहेत. त्यासाठी तुम्ही आर्थिक मदत करून सहकार्य करू शकता.

यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही मदत करावी ही विनंती. कपडे किंवा इतर वस्तू देऊन मदत करायची असल्यास खालील लोकांशी संपर्क करा. तुम्हाला आमच्यापर्यंत वस्तू, कपडे आणून देणे शक्य नसल्यास तसेही कळवा. कार्यकर्ते तुमच्याकडे येऊन तुम्हाला जी काही आर्थिक मदत किंवा वस्तू, कपडे रुपात मदत पोहचवायची आहे ती घेऊन जातील.

तुमच्या सहकार्याच्या प्रतीक्षेत..!!

यशवंत भंडारे        अवधूत खचनाळे    प्रफुल्ल आवळे     दिग्विजय म्हामणे      हरीकृष्णा आडकिल्ला।                                9822051146   9970751407    9011555605    9579220060.      9970250186

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *