देशात वाहन क्षेत्रात आणि कापड क्षेत्रात मंदी आल्यानंतर आता पारले कंपनीवर देखील मंदीचं संकट आलं आहे. पारलेच्या बिस्किटांची मागणी कमी झाल्याने 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे.

जीएसटी लागू होण्याच्या आधी 100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतींच्या बिस्कीटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी आम्ही केली आहे, असं पारले कंपनीचे प्रमुख मयंक शाह यांनी सांगितलं आहे. सर्वसाधारण पाच रुपये किंवा त्याहून कमी किंमतीत पाकीटं विकली जातात. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर, कंपनीतील आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढावे लागणार आहे. जर सरकारने जीएसटी कमी केली नाही अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *