महाराजा हरि सिंह यांचा मुलगा आणि काँग्रेस नेता डॅाक्टर करण सिंह यांनी जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाला  समर्थन दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. सरकारचा हा निर्णय चांगला आहे.

या आधी काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. मिलिंद देवरा, दीपेंद्र सिंह हुड्डा आणि जर्नादन द्विवेदी या काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कलम ३७० वरुन कॅंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *