आज आसामच्या राष्ट्रीय नागिरक नोंदणीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. एनआरसी मध्ये 3 कोटी 11 लाख 21 हजार लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच 19.06 लाख लोकांना या यादीत स्थान मिळालेलं नाही. एनआरसीच्या यादीत स्थान न मिळाल्याने लोक या विरोधात न्यायालयात अपील करु शकतात. या निर्णयानंतर राज्यातील अनेक ठिकाणी कलम 144 लावण्यात आलं आहे. या अंतिम यादीसंदर्भात काँग्रेसने दिल्लीत बैठक आयोजित केली आहे.

आसाममध्ये एनआरसीचं  खुप महत्त्व आहे. राज्यात 1979 ते 1985 या वर्षांत मोठी आंदोलने करण्यात आली. एनआरसीची यादी जाहीर होताच एनआरसी सेवा केंद्रच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. या निर्णयानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल यांनी शांतात राखण्याचे आव्हन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *