खासदार राहुल गांधी यांनी कलम ३७० वर मौन सोडलं आहे. खासदार राहुल गांधी यांनी सत्तेच्या गैरवापराने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी जम्मू काश्मीर तोडून, निवडून आलेल्या प्रतिनिधींना कैद करून तसंच संविधानाचं उल्लंघन करून एकतर्फी कारवाई याआधी केली गेली नाही. हा देश जमिनीच्या तुकड्यांनी नाही तर आपल्याच लोकांनी बनवला आहे. विधिमंडळ सत्तेचा गैरवापर केल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. देश लोकांमुळे बनतो, जमिनीच्या तुकड्याने नाही, असं खासदार राहुल गांधी म्हणाले.

अमित शहा काय म्हणाले

लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींच्या आदेशानुसार कलम ३७० च्या सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू होणार नसल्याचं सांगितलं. जम्मू काश्मीरचा मुद्दा राजकीय नसून कायदेशीर विषय आहे आहे. भारताच्या संविधानात जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर मध्ये कलम १ चे सर्व परिच्छेद लागू आहेत, असं शहा म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *