निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी भारताच्या आर्थिक संकटावर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये भारतात असं भीषण आर्थिक संकट पाहीलं नव्हतं. सध्याची भारताची आर्थिक स्थिती अभूतपूर्व आहे, असं ही कुमार यांनी म्हटलं आहे. नोटबंदी,जीएसटीमुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे.

सध्या खासगी क्षेत्रात कुणीही कर्ज देण्यास तयार नाही. देशात सध्या कोणही कोणावर विश्वास ठेवत नाही आहे. यावर सरकारने तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेमध्ये आलेलं हे संकट 2009 ते 2014 या काळात बॅंकांकडून मागचा पुढचा विचार न करता दिल्या गेलेल्या कर्जामुळे निर्माण झाल्याचंही राजीव कुमार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *