उत्तर प्रदेश मधील भाजप आमदार विक्रम सिंह सैनी यांनी जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्यानंतर वादग्रस्त विधान केलं आहे. आमदार विक्रम सिंह म्हणाले की, कलम ३७० रद्द झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. कारण आता ते काश्मीरमधील गोऱ्या-गोऱ्या मुलींसोबत लग्न करू शकतात. उत्तर प्रदेश मूजफ्फरनगर मधील खतौली येथे बोलताना त्याने हे वादग्रस्त विधान केलं.

नेमकं काय म्हटलं – 

आमदार विक्रम सिंह म्हणाले, ‘जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते उत्सुक आहेत. तसंच जे अविवाहित आहेत त्यांचं लग्न तिथेच लावून देऊ, काही अडचण नाही. काय अडचण आहे? याआधी तिथल्या महिलांवर अत्याचार होत होता. तिथल्या मुलीने उत्तर प्रदेशमधील तरुणाशी लग्न केलं तर तिचं काश्मीरी नागरिकत्व संपुष्टात येईल. भारताचं नागरिकत्व वेगळं, काश्मीरचं वेगळं. तसंच जे मुस्लिम कार्यकर्ते आहेत त्यांनी आनंद साजरा केला पाहिजे. लग्न तिथे करा ना काश्मीरी मुलींसोबत. हिंदू मुस्लिम सर्वांनी आनंद साजरा केला पाहिजे. हा संपूर्ण देशाचा उत्सव आहे.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *