बकरी ईदच्या  कुर्बानी मधील काही रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या, असं आवाहन मुस्लिम तरुणांनी केलं आहे. पूर परिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुक बंद असताना देखील राष्ट्र सेवा दल, मिरज, इचलकरंजीचे साथी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत  करीत आहेत. या मदतीत आपणही  आपला खारीचा वाटा उचलावा तसंच बकरी ईदच्या कुर्बानीतील थोडी रक्कम बाजूला काढून ती कोल्हापूर, सांगली  मधील पूरग्रस्तांना द्यावी  अशी विनंती आम्ही करीत आहोत, असं राष्ट्र सेवा दलाचे मुंबईतील कार्यकर्ते निसार अली सय्यद यांनी म्हटलं आहे.

मदतीसाठी राष्ट्र सेवा दलाचे मुंबईतील कार्यकर्ते निसार अली सय्यद यांना 9967518107 या क्रमांकावर संपर्क साधावा.

आपले,

निसार अली सय्यद,अब्दुल मतीन खान,वैशाली सय्यद,फिरोज अन्सारी,अफरोज अन्सारी,अफझल शेख,जाफर शेख,नासिर सय्यद,रुबिना खान,अरिफा शेख,मुश्ताक शेख,इशा सय्यद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *