नाशिकमध्ये अजित पवारांनी गिरीश महाजनांबद्दल आक्षेपार्ह टीका केली म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी तसंच पवारांचा पुतळा जाळून आपला राग व्यक्त केला. ‘गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचा जाहीर निषेध’, अशा आशयाचा बॅनर नाशिकमधील राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच लावण्यात आला आहे. यामुळे शहरांत काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रकरण चिघळण्याआधीच बॅनर काढुन घेतले.

नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय वातावरण तापलं आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर नाशिक चे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाचून आनंदोत्सव साजरा करतानाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला होता. यावर अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका करत राज्यात पूर परिस्थिती असताना नाच करता असं म्हटलं होतं.

नेमकं काय म्हणाले अजित पवार

नाशिकमध्ये पूरस्थिती असताना काही मंत्री नाचत होते. नाचायचं काम तुमचं नाही, टीव्हीला बघितलं की नाही, काय चाललंय. पाणी आलेलं बघा, नाचताय काय, नाचायचं काम तुमचं नाही, नाचायचं काम नाचणारे करतील, इथे पूर आला आणि मंत्रीमहोदय नाचतात, असं अजित पवार म्हणाले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *