सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना संपूर्ण देशातून मदत पोहचत आहे. राज्य सरकार मात्र मदत केल्याची जाहिरातबाजी करत आहे. पूरग्रस्तांना दिलेल्या तांदळाच्या पिशवीवर मुख्यमंत्री आणि आमदारांचा फोटो असलेले स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यावर ‘महाराष्ट्र शासन तर्फे’ असं लिहिलेलं आहे. लोकप्रतिनिधी आपण केलेल्या मदतीची अशी जाहिरात करणं योग्य आहे का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. हे सरकार जाहिरातीचं सरकार असल्याची टीका या आधीही झाली होती.

असंवेदनशील सरकारच्या कारभार

राज्य सरकारने ७ ऑगस्ट रोजी काढलेल्या जीआरमध्ये अक्षरशः लोकांची थट्टा केली आहे. या जीआरमध्ये असं म्हटलं आहे की, नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस जर घरं पाण्यात बुडाली असतील तरंच सरकारी मदत मिळेल. महाराष्ट्रात काल राज्याचे जलसंपदा मंत्री हे पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी सेल्फी काढला होता. या सर्वच घटणामुळे सरकारची पूरग्रस्तांसाठी असंवेदनाशीलता दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *