केंद्र सरकारने अनेक बँकांच्या विलनिकरणाचा निर्णय घेतला आहे. परंतू या निर्णयाचा अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघाच्या दहा सदस्यांनी या विलनिकरणाचा विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात सरकारी आणि खासगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी हातावर काळी पट्टी बांधत आपला निषेध नोंदवला आहे.

अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघाचे महासचिव असं म्हणातात की, सरकारचा हा निर्णय चूकीच्या वेळी आला आहे. या निर्णयाची समीक्षा करण्याची गरज आहे. या विलनिकरणामुळे 6 बॅका बंद होणार आहेत. केंद्र सरकारच्या या मोठ्या निर्णयाने देशातील सरकारी बँकांची संख्या आता 12 झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बॅंकाच्या विलनिकरणाची घोषणा करत असं म्हटलं की भारतीची अर्थव्यवस्था पाच हजार अरब डॅालर बनवण्याचा सरकारचा विचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *