अभिनेता अजय देवगण नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरात मधील मांडवी येथे गेला होता. श्री नागनाथ महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना त्याने हाफ पँट-टीशर्ट परिधान केलं होतं. तेव्हा त्याला नेटकऱ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्रोल केलं.

‘अजयने मंदिरात असे कपडे परिधान करायला नको होते’, असा सल्ला अनेकांनी त्याला दिला आहे. त्याचे अनेक चाहते नारज देखील झाले आहेत. सध्या तो‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’या चित्रपटामध्ये व्यस्त आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *