गोव्यातील काँग्रेसच्या १० आमदारांच्या भाजप प्रवेशावर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपवर टीका केली आहे. वडिलांच्या निधनानंतर भाजप पक्षाने दुसरा मार्ग स्वीकारला आहे. भाजपमधुन आता विश्वास आणि वचनबद्धता हे शब्द संपले असल्याचं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

माझे वडील हयात असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्त्व होतं. पक्षांची ही मुल्यं  होती. परंतु १७ मार्च नंतर पक्षातून दोन्ही शब्द अदृश्यं झाले आहेत. पक्षाने वडिलांच्या निधनानंतर वेगळीच दिशा पकडली आहे. आता काय योग्य आहे ते वेळच सांगेल, असं उत्पल पर्रिकर पिटीआयशी बोलताना म्हणाले.

गोवा विधानसभेतील काँग्रेसच्या १५ आमदारांपैकी १० आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘राज्य आणि आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असून यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही.  कोणतीही अट न ठेवता ते भाजपमध्ये सहभागी झाल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *