गोरेगाव मधील आंबेडकर नगरमध्ये काल रात्री साडे दहाच्या सुमारास तीन वर्षाचा चिमुरडा नाल्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अद्यापही या मुलाला शोधण्यात यश आलेलं नाही. महापौर विश्वनाथ महाडेश्वर या परिसरात येण्यापूर्वीच स्थानिकांनी आंबेडकर चौकात रास्तारोको करून हा संपूर्ण रस्ता अडवून धरला होता.

दिव्यांश धानसी असं या चिमुरड्याच नाव आहे. दिव्यांश घरातून खेळता खेळता रस्त्यावर आला. रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरून तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. नाल्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये दिसत आहे.  पोलीस, पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले आहे.  पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ तासांपासून या मुलाचा शोध घेत आहेत. मात्र त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *