तीन तलाक विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. तीन तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सादर केलं. एकीकडे मुली सुवर्ण पदक घेऊन येत आहेत, फायटर विमान चालवत असताना दुसरीकडे परंपरेच्या नावावर त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

राज्यसभेतील घडामोडी
●ऐतिहासिक तीन तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं.
●तीन तलाक वरील अंतिम मतदान पूर्ण.
●राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांचं ऐक्य तुटलं.
●तीन तलाकवरील दिग्विजय सिंह आणि हुसैन दलवाई यांचं संशोधन प्रस्ताव नाकारला.
●पीडीपी आणि बीएसपी पक्ष मतदानात सामील झाले नाहीत.
●जेडीयु, एआयएडीएमके आणि टीआरएस पक्षांनी मतदान करण्यास नकार दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *