सेक्रेड गेम्स या वेब सीरिजने भारतीय लोकांची मने जिकंली. या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक वाट पाहत होते. आज नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन सेक्रेड गेम्स २ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जंग का वक्त आ गया है’, म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देतो.

पहिल्या भागातील सैफ अली खान नवाजुद्दीन सिद्दीकी, जतीन सारना, पंकज त्रिपाठी हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेत्री कल्की अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकारां या सीरिजमध्ये झळकणार आहेत. विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स या कांदबरीवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. आता या सीरिजमध्ये नेमक काय घडणार यांची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *