सोनम कपूरच्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटानंतर समलैंगिक संबंधांवर दुसरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. ‘शीर कूर्मा’ असं या चित्रपटाच नाव असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन फराझ आरिफ अन्सारी करणार आहे. या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा सिक्री यामध्ये महत्त्वाची भूमिका साकरणार आहे.

या चित्रपटात आपल्या समलैंगिक प्रेमी अशाप्रकारे स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आणि कुटुंबानं स्वीकारावं यासाठी कोणत्या प्रकारचा संघर्ष कारावा लागतो हे या चित्रपटातून समजणार आहे. स्वरा आणि दिव्या दोघी संवेदशील कलाकार आहेत. यामुळे या चित्रपटाकडून चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *