‘ससुराल सिमर का’ फेम बालकालाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू झाला आहे. गुरुवारी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांची कार एका ट्रकला जाऊन धडकली. यावेळी त्याचे आई-वडील त्याच्यासोबत होते. या अपघातात शिवलेखचा जागीच मृत्यू झाला आहे. रायपूरचे पोलीस अधिक्षक आरिफ शेख यांनी या दुर्घटनेला दुजोरा देत, ट्रक चालक फरार झाला असल्याची माहिती दिली.

या अपघातात त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. शिवलेखाच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे. शिवलेख मुळचा छत्तीसगढचा आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून तो आई-वडिलांसोबत मुंबईत राहत होता. शिवलेखने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘संकटमोचन हनुमान’, ‘ससुराल सिमर का’ या मालिकांसह रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *