राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती  करत चर्चेला पूर्णविराम दिला. रुपाली चाकणकर या पुण्याच्या माजी शहराध्यक्षा आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर चित्रा वाघ यांनी राजीनामा दिला. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये येत्या ३० जुलैला प्रवेश करणार आहेत.  नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शुक्रवारी त्यांनी अकोला येथे मुख्य कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन  मतं जाणून घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *