राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात परभणी येथे रिक्षा ओढो आंदोलन केलं. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील करात वाढ केली आहे. या दरवाढीविरोधात परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षा ओढत आंदोलन केलं. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.

देशात सर्वांत महाग पेट्रोल आणि डिझेल परभणीत मिळतं. परभणीमध्ये डिझेल ७०.३८ पैसे प्रतिलिटर आणि पेट्रोल ८०.४१ पैसे प्रतिलिटर दराने मिळत आहे. परभणी जिल्ह्याचा विकास झाला नाही. केवळ इंधन दरवाढ तसंच महागाई वाढीतंच जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत आहे, असे आरोप आंदोलनकर्त्यांनी केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *