बॉलिवूडचे अॅक्शन हिरो हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघे ‘वॅार’ या चित्रपटात झळकणार आहेत. ‘वॅार’ हा अॅक्शन सिनेमा असून, आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघे स्टार अॅक्शन, शरीरयष्टी, आणि डान्ससाठी ओळखले जातात. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मने केली आहे. या चित्रपटात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅक्शन सीन आहेत. हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देणारा हा टीझर आहे. भरपूर अॅक्शन, फॉरेन लोकेशन, ड्रामा असल्यामुळे या टिझरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *