खासदार राहुल गांधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवर लोकसभेत आक्रमक झाले आहेत. वायनाडमधील ८ हजार शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरली नसल्याचं सांगत बँकांनी त्यांना नोटीसा पाठवल्या. अनेकांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली, असं राहुल गांधी म्हणाले. केरळमधील बँकांच्या कारवाईनंतर गेल्या दीड वर्षांत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत मोठ्या व्यावसायिकांचे ५.५ लाख कोटींचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्यांवर कारवाई आणि व्यावसायिकांना सुट, अशी दुहेरी भूमिका सरकार का घेत आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केला.

केरळ सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. तसंच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी कोणतीही ठोस पावलं या अर्थसंकल्पात उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत. तसंच कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून बँकांनी त्रास देऊ नये यासाठी सरकारने लक्ष द्यावं. सोबतच केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालावं. याबाबतची विनंती रिझर्व्ह बँकेला सरकारने करावी, असं राहुल गांधींनी म्हटलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *