विधानसभेच्या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी दिले आहेत. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा काही प्रश्नच येत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन आता महिना झाला. मात्र, काँग्रेस अध्यक्ष कोण होणार, हे अद्याप स्पष्ट नाही. ‘कदाचित वाटाघाटी करायच्या झाल्या तर त्या कोणासोबत करणार?’ असा प्रश्नप्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेसाठी काँग्रेसला ४० जागा सोडू, असं म्हटलं होतं. यावर हे हास्यास्पद विधान असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. यावरून आगामी विधानसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेस-वंचितची आघाडी होणार को नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *