पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्यात एकूण किती खर्च झालाया विषयी कोणतीच माहिती सरकारकडे नाही. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सुमारे ३२ लाख रुपये साउंड सिस्टम आणि वीजेच्या उपकरणांवर खर्च करण्यात आले. अशी माहिती आरटीआईच्या माध्यामातून मिळाली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण सोहळा हा इतिहासातील सर्वात मोठा शपथविधी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी ८,००० पाहूणे आले होते.

आरटीआईच्या माहितीनुसार २०१४ च्या शपथ विधी सोहळ्यापेक्षा २०१९ चा शपथविधी सोहळा हा दीडपट मोठा होता. पतंप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात फर्नीचरव्यासपीठ यासाठी सुमारे १७.६० लाख इतका खर्च आला होता. शपथ विधीचा एकूण खर्चा किती झाला हे सांगण्यात येणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *