गोरेगावमधील आंबेडकर नगरामध्ये  गटारात वाहून गेलेला तीन वर्षांच्या दिव्यांश याला शोधण्यात अद्यापही यश आलेलं नाही. गेले ३७ तास या बालकाचा शोध सुरुच आहे. या परिस्थितीमुळे दिव्यांशचे आई-वडिल प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. आपला पोटचा गोळा भेटत नसल्याने ते हतबल झाले आहेत. काळजावर दगड ठेवत त्यांनी म्हटलं की, माझ्या दिव्यांशचं मृत तोंड तरी मला पाहू द्या.

या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाने तब्बल दहा  किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली मात्र, दिव्यांशचा अद्याप पत्ता लागलेला नाही. ही घटना बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली होती. दिव्यांश खेळता खेळता तो घराबाहेर आला. घरी परत जाताना पाय घसरुन तो उघड्या गटरात पडला. या भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे पाणी वेगाणे वाहत होते.  या पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला असावा, असं उपलब्ध सीसीटीव्हीमधील चित्रीकरणावरुन समजतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *