वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत संघाच्या तसंच भजपच्या लोकांना सामावून घेतलं आहे. याचा फायदा भाजपला लोकसभेत झाला. आता ही आघाडी वंचितांची नसून उच्चवर्णीयांची झाली आहे. असे गंभीर आरोप त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर केले आहेत.

गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचं महासचिवपद देण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकरांचे संघ आणि भाजप सोबत पूर्वी संबंध होते. त्यांना दिलेल्या पदावर आक्षेप घेत आघाडी उभारण्यात आम्ही मेहनत घेतली, आता हे आयत्या बिळावर नागोबा झाले आहेत, असं लक्ष्मण मानेंनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने समविचारी आणि पुरोगामी पक्षांना पाठिंबा द्यायला हवा होता. परंतु तसं न केल्याने प्रतिगामी पक्षांना त्याचा फायदा झाला. प्रतिगामी पक्षांना केलेली मदत ही आमची चूक होती. मी एक सच्चा आंबेडकरवादी आहे. त्यामुळे संघ, भाजप आणि शिवसेनेचे समर्थन करू शकत नाही. वंचित आघाडीच्या प्रवक्तेपदाचा मी राजीनामा दिला आहे. तसंच मी प्रकाश आंबेडकरांसोबत काम करू शकत नाही. याबाबतचं पत्र प्रकाश आंबेडकरांना पाठवलं आहे, असं लक्ष्मण मानेंनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *