प्रा.वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे गाजलेलं मराठी नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे शिवधनुष्य उचलले आहे. तब्बल 40 वर्षांनी हे नाटक  पुन्हा रंगभूमीवर येणार आहे.  प्रा. वसंत कानेटकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये या नाटकचा पहिला प्रयोग होणार आहे.

डॅा.श्रीराम लागू यांनी गाजवलेली नानासाहेबांची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे करणार आहेत. त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, मीनल बाळ, कृष्णा राजशेखर हे कलाकार नाटकत दिसणार आहेत. राहूल रानडे यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे. नव्या कलाकांरसह हे नाटक नाट्य रसिकांच्या किती पसंतीस येतं हे पाहण्यासारखं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *